Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

राधिका गुप्ता ठरली ‘वाय वाय ग्लोकल टीन हिरो’ची मानकरी

पुणे : ‘ग्लोकल टीन इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्तरप्रदेश येथील १६ वर्षाची शिक्षणतज्ज्ञ राधिका गुप्ता ही ‘वाय वाय ग्लोकल टीन हिरो’ या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ‘ग्लोकल’चे कार्यकारी संचालक आशिष ठाकूर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुमारवयीन मुलांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

ग्लोकल टीन इंडिया ही स्पर्धा युवकांना आपले कर्तृत्व आणि कौशल्य भारतातील विविध क्षेत्रातील नामवंतांसमोर सादर करण्याची संधी देणारे व्यासपीठ आहे. यात देशभरातून १७३ युवकांनी सहभाग घेतला. समाजातील वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांना पसंतीची दाद देऊन राधिका गुप्ता हिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राधिकाचे यू ट्यूब चॅनलही आहे. त्यावर ती मुलांसाठी उपयुक्त कंटेंट तयार करते.

किशोरवयीन मुलांनसाठीचे व्यासपीठ 

आजची िकशोरवयीन पिढी ही फक्त हुशारच नसून विविध क्षेत्रात कामही करत आहे. त्यातील काहीजण उद्योजक, आरोग्य कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत. यापूर्वी मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी फार काही साधने आणि संस्था नव्हत्या. म्हणूनच वाई वाई आणि ग्लोकल प्रायव्हेट लिमिटेड, नेपाळ यांनी पाच वर्षांपूर्वी दक्षिण आशियातील किशोरवयीन मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी हे व्यासपीठ स्थापन केले.

– मॅथ्यू मत्तम, सचिव, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज (सीवायडीए)

पालकांनी मुलांना स्टेज, स्कोप आिण सपोर्ट देणे आवश्यक 

आजकाल पालक मुलांना प्रोत्साहन देण्या ऐवजी त्यांच्यामागे अभ्यासाचा तगादा लावतात. त्यामुळे मुलांना जे करून दाखवायचे आहे ते करता येत नाही. पण पालकांकडून अपेक्षित असलेले वातावरण िमळवून देण्याचे काम वायवाय, ग्लोकल आिण सीवायडीए या संस्था करीत आहेत. पालकांनी मुलांना स्टेज, स्कोप आिण सपोर्ट हे तीन ‘एस’ देणे अावश्यक आहे.

– राही भिडे, ज्येष्ठ पत्रकार

ही मुले इतरांसाठी प्रेरणा असतील 

आम्हाला १३ ते १८ वयोगटातील मुले जे महत्वाचे सामाजिक काम करत आहेत त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. त्यांना ओळख प्राप्त करून द्यायची आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मदत करायची आहे. ही मुले इतरांसाठी प्रेरणेचा स्रोत बनतील.

– आशिष ठाकूर, कार्यकारी संचालक, ग्लोकल प्रायव्हेट लिमिटेड

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading