Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

केलेल्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा या हेतूने सोहळ्याचे आयोजन- कैलास बनसोडे

पुणे: ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा 2021 आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात समाज भूषण, कृषिरत्न कृषिभूषण, शिक्षक रत्न, उद्योग आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने सोहळ्याचे आयोजन केल्याचे संस्थापक कैलास बनसोडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

याप्रसंगी माईंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिंकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजोग कदम, महात्मा फुले वंशज नीताताई होले, महापौर उषा माई ढोरे, संशोधन अधिकारी यशदा बबन जोगदंड, कॅप्टन अजय मनसुके, उपायुक्त अनिल शेजाळ, कृषी अधिकारी श्रीकृष्ण सावंत, पोलीस उपाधीक्षक संतोष गायके आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात श्रेयस एज्युकेशनल संस्थेच्या महिला व सर्व सहकारी यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामधे श्रीकृष्ण सावंत, मिनीनाथ वाकळे, संतोष डिंबळे, संतोष शास्तुकर, कृष्णा थापडे, बाळासाहेब चव्हाण, रामदास चव्हाण, तुकाराम माळवे, जालिंदर म्हेत्रे, सोमनाथ मोरे, महेश चरवड, सतीश बांदल, प्रवीण शेटे, अतुल पवार, शीतल भोसले…

रेखा घुले, ज्योती चौधरी, अश्विनी गावडे, धनिता सुतार, अंजना जगताप, सोनाली चौगुले, सुनिता डांगे, आरती माळी, मीना घोरपडे, तनुजा पाटील, श्रद्धा सावर्डेकर, नंदाताई भालशंकर, स्वाती हनमघर, श्री महालक्ष्मी हलगी ग्रुप काझड, सुवर्णा खोडदे, धनश्री काळे, चंदा पायगुडे, अमोल मोहिते, श्रद्धा दंडवते यांच सामावेश होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading