Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

‘इंटेलिजंट पॉवर मॅनेजमेंट अँड आय ओ टी बेस्ड सोल्युशन’ या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

पुणे : वीज उपकरणे,वहन यंत्रणा ,इलेक्ट्रिक वाहने याद्वारे होणाऱ्या आगींपासून बचाव करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवून मनुष्य हानी आणि वित्तहानी टाळणे शक्य असल्याचा सूर शनिवारी झालेल्या ‘इंटेलिजंट पॉवर मॅनेजमेंट अँड आय ओ टी बेस्ड सोल्युशन ‘ या चर्चासत्रात उमटला .

पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स् प्रा.लि. ,इटन आणि ‘पॉवर इझी ‘ या कंपन्यांद्वारे या चर्चासत्राचे आयोजन हॉटेल हयात ,कल्याणीनगर येथे करण्यात आले होते . गृहनिर्माण संस्थांचे आणि विविध सेवा देणाऱ्या संस्था ,फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपन्यांचे , क्षेत्रातील प्रतिनिधी या चर्चासत्रात उपस्थित होते .विषय तज्ज्ञ डॉ तेजस जव्हेरी (इंग्लंड ), कैलास बाहेती (पॉवर टेक्निक्स इन्फोसोल्युशन्स प्रा.लि.) ,श्रीशा नगर (इटन) यांनी आग प्रतिबंधक विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान ,प्रणाली आणि साधनांविषयी मार्गदर्शन केले .

करोना काळात रूग्णालयात झालेल्या शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत असो वा इतर ठिकाणीही विजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर आग लागून लोक या अपघातात मरण पावतात, अशा प्रकारात आग लागण्याचे नेमके कारण लक्षात येत नाही, ते आग लागण्याआधीच वीज व्यवस्थेतील होणारा बिघाड वा होऊ घातलेल्या अपघाताची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा पॉवर इझी या कंपनीने तयार केली असून ती रुग्णालयात, हॉटेल, बिझनेस कॉम्प्लेक्स, माॅलमध्ये बसविण्याचे काम पॉवर टेक्निक इन्फोसोल्युशन्स या कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे संचालक कैलास बाहेती यांनी दिली.

‘पाॅवर इझी’ कंपनीने देशातील पहिले ‘आय ओ टी (इंटरनेट ऑन थिंग्स )प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान आणि यंत्रणा तयार केली आहे, जे मोठ्या इलेक्ट्रिकल अपघात होण्याआधीच या गोष्टी , धोका डिटेक्ट करतात आणि तशा सूचना अलार्म देतात . मोठे अपघात आणि मनुष्य हानी टाळण्यासाठी त्याची मदत होते, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस जव्हेरी यांनी दिली

‘प्राॅडक्ट बिल्डिंग ग्रिड’ या उपकरणामळे येणाऱ्या काळात ई-कार साठी लागणारी मोठ्या प्रमाणावरील इ-व्ही चार्जीग सिस्टीम वर येणारा महाकाय बोजा सहन करण्याची क्षमता या ‘प्राॅडक्ट बिल्डिंग ग्रिड’ मधे आहे, अशी माहिती ईटन कंपनीच्या हेड ऑफ चॅनल श्रीशा नागर यांनी दिली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading