आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त गुलाब पुष्पांची भेट
मनसे महिला आघाडीचा उपक्रम
पुणे : आंतरराष्ट्रीय पर्वत दिन (११ डिसेंबर ) निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर महिला आघाडीतर्फे पर्वती येथे गुलाबपुष्पांचे वाटप करण्यात आले.टेकड्यांवर येणाऱ्या पुणेकरांना ही भेट देण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर महिला आघाडी शहराध्यक्ष सौ वनिता वागसकर,जिल्हाध्यक्ष सुशीला नेटके,पुणे शहर उपाध्यक्ष अस्मिता शिंदे,विभाग अध्यक्ष हेमा सट्टे,नाझ इनामदार रेश्मा थोपटे,पल्लवी भांडे तसेच पक्षाच्या जनहित विधी विभागाचे एड योगेश आढाव उपस्थित होते .
