Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र अंधत्व मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज :राजेश टोपे

पुणे : महाराष्ट्र अंधत्व मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे मत राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. तसेच नेत्रोपचार करणाऱ्या दवाखान्यांना ‘डे केअर सेंटर ‘ म्हणून नोंदणीची मान्यता मिळण्यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार बदल करेल,असे आश्वासनही टोपे यांनी दिले .

पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या ‘पी.ओ.एस.स्पेक्ट्रम २०२१’ या वार्षिक परिषदेचे उद्घाटन शनिवारी (११ डिसेंबर) रॉयल कॅनॉट बोट क्लब पुणे येथे झाले. उदघाटनाच्या सत्रात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिषदेला ऑनलाइन संबोधित केले.उद्घाटन समारंभासाठी पद्मश्री डॉ तात्याराव लहाने,ब्रिगेडियर डॉ.एन एस मणी उपस्थित होते. परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.संजय टेकावडे,सचिव डॉ.ऋजुता माचवे,खजिनदार डॉ.सीमा खैरे,​प्रमुख ​विश्वस्त डॉ प्रकाश मराठे यांनी स्वागत केले. परीषदेचे हे १४ वे वर्ष आहे. 

राजेश टोपे म्हणाले ,डोळे हे ज्ञानेंद्रिय असल्याने नेत्रदानाचा प्रसार व्हायला हवा . मरणोत्तर नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी परवानगीची प्रक्रिया सोपी केली जात आहे . अंधत्व कमी करण्यात यश मिळत आहे ,आगामी वर्षात ते आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे . त्यासाठी अंधत्व मुक्त महाराष्ट्र उद्दिष्टासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे . तपासणीसह ,प्रतिबंधात्मक उपायांवर आपण भर द्यायला हवा. 

डॉ तात्याराव लहाने म्हणाले ,कोविड साथीचा धोका कमी झा​ला तरी मास्क वापरण्याची सवय जाता कामा नये .कोविड मुळे डोळ्यांच्या समस्या देखील निर्माण झाल्या .अशावेळी नेत्र तज्ञ आणि पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या नेत्रोपचाराचे योगदान महत्वपूर्ण आहे .नेत्रपटल दानाचे प्रमाण वाढायला हवे.

नेत्र तज्ञांचा गौरव

या परिषदेमध्ये डॉ विश्वास डाके यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला .शुभदा नारायण कुलकर्णी गुणवत्ता सन्मान डॉ मदन फडणीस यांना देण्यात आला .डॉ मधुसूदन झंवर पुरस्कार डॉ सीमा खैरे यांना देण्यात आला .कै आशा केळकर पुरस्कार डॉ किशोर पाहुजा यांना देण्यात आला . साहेबराव सत्यवती मदान स्मृती पुरस्कार डॉ जीवन लाडी यांना तर डॉ विजय जठार पारितोषिक डॉ क्षितीज तांबोळी यांना देण्यात आले . ​निखील मसुरकर यांचाही सत्कार करण्यात आला .​परिषदेला एकूण ४०० नेत्र तज्ञ उपस्थित होते .

Leave a Reply