बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप
पुणे:बोपोडी मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह अंतर्गत बोपोडीत बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने शालेयविद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संयोजन व अध्यक्ष प्रभाग क्रमांक ८च्या महिला अध्यक्षा शोभाताई आरूडे या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीनगर मतदार संघाचे अनुसूचित जाती जमाती विभागाच्या अध्यक्ष इंद्रजीत भालेराव होते. कार्यक्रमास बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेन्द्र भुतडा, उपाध्यक्ष ऍड विठ्ठल आरूडे, सरचिटणीस करीम भाई तुर्क, बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष साजिदभाई शेख, बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष मयुरेश गायकवाड, प्रभाग क्रमांक ८अ अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षा अख्तरीशेख, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्तार मिस्त्री, अफजल खान, रवी नायर, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
