नित्यानंद भोजनालय येथे शिवभोजन थाळी उपक्रम
पुणे:ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या आपल्या पुणे शहरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.घरापासून लांब राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष जितेंद्र टकले यांनी टिळक रोड वरील नित्यानंद भोजनालय येथे शिवभोजन थाळी उपक्रम सुरू केला आहे.या शिवभोजन थाळी केंद्राचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला व हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केल्याबद्दल जितेंद्र टकले यांचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अभिनंदन केले.
