Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर


पुणे :पद्मविभूषण  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस,कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजिंक्य पालकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष दीपक पोकळे यांच्या वतीने महाराणा प्रतापसिंह उद्यान, सदाशिव पेठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अध्यक्ष प्रदीप गारटकर,कसबा विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक आप्पासाहेब रेणुसे,कात्रज डेअरीचे संचालक भगवानराव पासलकर, सुनील खाटपे,जितेंद्र टकले,कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे, कार्याध्यक्ष निलेश वरे,राहुल तांबे,फईम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading