Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सहकारातून समृद्धी साधण्याकरीता युवकांचा सहभाग गरजेचा – विद्याधर अनास्कर

पुणे : सहकारातून समृद्धीकडे हे तत्व प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात आणण्यासाठी त्यामध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग असला पाहिजे. सर्व क्षेत्रांचा विकास गतीने झाला, तरच समाजाचा विकास होईल. यादृष्टीने सहकार क्षेत्र ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे मत विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को -आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात ३६ व्या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले. सहकाराचे सक्षमीकरण व्हावे आणि या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढावा, याउद्देशाने आयोजित परिषदेचे उद््घाटन भारतीय राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी (माजी मंत्री, गुजरात) यांच्या हस्ते झाले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, माजी सनदी अधिकारी डॉ.एस.के.गोयल, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूटच्या संचालक डॉ.हेमा यादव, आयएसएससीचे मानद सचिव प्रा.अनिल कारंजकर, अ‍ॅड.सुभाष मोहिते, अ‍ॅड.जयंत कुलकर्णी, प्रा.डॉ.मुकुंद तापकीर, संजीव खडके आदी उपस्थित होते.

इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को-आॅपरेशन, पुणे (आयएसएससी) यांच्यासह पद्मश्री डॉ.विखे पाटील सावित्रीबाई फुले अध्यासन पुणे विद्यापीठ आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून  ही परिषद होत आहे.

विद्याधर अनास्कर म्हणाले, एकाच प्रकारचे ध्येय असणा-या व्यक्ती विकासासाठी प्रयत्न करतात, हे सहकार क्षेत्राचे मूलतत्व आहे. परंतु सहकारातून वैयक्तिक समृद्धी कडे जाणा-यांची संख्याही वाढत आहे, अशा वैयक्तिक लाभ घेण्यासाठी येणा-यांना सहकार क्षेत्राचे दरवाजे बंद केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

दिलीप  संघानी म्हणाले, सहकार क्षेत्राचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. परंतु सहकार पाया मजबूत करण्यासाठी  योग्य ती पावले गेल्या अनेक वर्षात उचलली गेली नाहीत. सहकार मजबूत झाले तरच विकास अधिक गतीने होऊ शकेल.

डॉ.नितीन करमाळकर म्हणाले, युवकांचे सहकार क्षेत्रामध्ये योगदान वाढण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आह.े त्यासाठी येत्या काही वर्षांमध्ये सहकार विषयक अनेक उपक्रम आणि सहकार अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवला जाणार आहे, असेही ते म्हणाले. हेमा यादव म्हणाल्या, सहकाराच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन अधिक गतीने विकास होऊ शकतो. युवकांना सहकार क्षेत्राची गोडी निर्माण करणे ही सहकार क्षेत्राची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading