2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त काँग्रेस पक्षच लढत देणार -कन्हैया कुमार
पुणे : काँग्रेस पक्षाची देशातून सत्ता गेली. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा परत देशात निवडून येणार नाही असे सगळ्याना वाटू लागले आहे. पण येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ला एकच पक्ष लढत देईल तो म्हणजे काँग्रेस पक्ष असेल, असे मत काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार आज व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप ते बोलत होते.
यावेळी पुणे श्रमिक संघाचे मंगेश कोळपकर ,डॉ. सुजित तांबडे सरचिटणीस उपस्थित होते.
आज देशातील बदलती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती’ या विषयावर काँग्रेसचे नेते कन्हैया
कुमार यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
कन्हैया कुमार म्हणाले, काँग्रेस हा पक्ष एक राजकीय पक्ष असून स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. गरजू लोकांना मदत करणारी अशी ही काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला.
मी जिथे आहे तिथे खूश आहे
काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून सारखा वाद निर्माण होतो आहे. त्यावर कुमार म्हणाले, निवडणूका आल्यावर नक्कीच कॉँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ठरेल, याची मला खात्री आहे. लोकसभा व विधानसभेवर तुम्ही कधी दिसणार असे पत्रकारांनी विचारले असता कन्हैया कुमार म्हणाले, मी जिथे आहे तिथे खूश आहे.
पुण्यात बेंगलोर पेक्षा अधिक ट्रॅफिक
पुणं कस वाटलं या प्रश्नावर उत्तर देताना कन्हैया कुमार म्हणाले, 2-3 वर्षा पूर्वी बेंगलोर मध्ये ट्रॅफिक खूप होती पण आता पुण्यात बेंगलोर पेक्षा अधिक ट्रॅफिक आहे .मोसम बदलत आहे. पुणे शहरातील काँग्रेस कमिटी ही खूप जुनी आहे. आज आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह समारोपानिमित्त मला पुण्यात आज यायला भेटले याचे मी पुणे काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.
