Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी परिवार संवाद शिबीर’

पुणे : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने  शरद  पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी परिवार संवाद शिबीर’ भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.मा.प्रशांतदादा जगताप यांनी पक्ष संघटना व महानगरपालिका निवडणूक, .शांतीलाल सुरतवाला यांनी महागाई, रविंद्र माळवदकर यांनी पवार साहेबांचे महिला विकास धोरण व त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे निर्णय, अंकुश काकडे यांनी केंद्रीय यंत्रणांचे गैरवापर,  दिपक जगताप यांनी बुथ कमिटी, संतोष नांगरे यांनी ओबीसी आरक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी .मृणालिनी वाणी, .वनराज आंदेकर, निलेश निकम, प्रदिप देशमुख, शिल्पा भोसले, मशंकर शिंदे, सारिका पारेख, .अजिंक्य पालकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक .गणेश नलावडे यांनी तर सूत्रसंचालन .किरण कद्रे तर आभार .युसूफ शेख यांनी मानले. शिबिराचे संयोजन गणेश नलावडे, निलेश वरे, दिपक पोकळे यांनी केले होते.

Leave a Reply