महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभाविप कडून इंदापुर मध्ये मशाल फेरी
इंदापूर: आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आय कॉलेज इंदापूर ते नगरपरिषद इंदापूर मशाल फेरी काढण्यात आली.त्यानंतर जोरदार घोषणा देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख भरत आसबे,शहरमंत्री,अवधूत बाचल, आंदोलन प्रमुख सुरज खामगळ,सौरभ सुसलादे व इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.
अवधूत बाचल म्हणाले,आज भारतरत्न, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आय कॉलेज इंदापूर ते नगरपरिषद इंदापूर मशाल फेरी काढण्यात आली.असे अवधूत बाचल म्हणाले.
