Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकांमूळे हजारो विद्यार्थ्यांना फटका

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. ही परीक्षा P S I , S T I , A S O या पदांकरिता घेण्यात आली होती. अंतिम उत्तरतालिका 17 नोव्हेंबर 2021प्रसिद्ध करण्यात आली. परंतु या उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

  असे म्हणणे आहे की, आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजीच्या प्रश्नपत्रिकेत’ आयोगाने गौताळा औट्रमघाट हे ‘राष्ट्रीय उद्यान’ असे नमूद केले आहे . प्रथम आयोगाने हे उत्तर बरोबर दिले. परंतु विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाताच दि. 25 नोव्हेंबरला MPSC आयोगाने ने हे  प्रश्न आडमुठेपणाने  रात्री साडे आठ वाजता तृतीय उत्तर तलिका प्रसिद्ध करून रद्द ठरवले. राष्ट्रिय उद्यान आणि अभयारण्य यांच्या निकष मधील फरक लक्षात घेता हे विधान चूक ठरत आहे. काल राज्यसेवा मुख्य परीक्षेत गौताळा हे अभयारण्य आहे असे संदर्भ असलेला प्रश्न आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अशा चुकामूळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. 

एमपीसचे विद्यार्थी योगेश बरबडे म्हणाले,  वन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर सुधा याचा संदर्भ हा गौताळा अभयारण्य असाच आढळून येत आहे . शासन दफ्तरी जर गौताळा हे अभयारण्य अशी नोंद असेन तर ते प्रश्नपत्रिकेत गौताळा ‘राष्ट्रीय उद्यान ‘ कसे बरोबर आहे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर गौताळा हे आज अभयारण्य होत असेल तर मग विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचा विचार न करता रद्द का ठरविला हे विद्यार्थ्या समोर यक्ष्य प्रश्न आहे . 

परिक्षार्थी सुरज पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नांवर आक्षेप घेतले आहेत त्यावर आयोगाने पुनर्विलोकन करावे व सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करावी  आणि पुढील प्रक्रिया ही पारदर्शी आणि निःशंकृत करावी अशी मागणी विद्यार्थी , विविध विद्यार्थी संघटना आणि पालकवर्ग ,  सामाजिक संघटनामार्फत होत आहे..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading