Saturday, October 31, 2026
BusinessLatest News

अपर्णा एंटरप्राईजेसतर्फे व्हिटेरो टाईल्सची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक

पुणे : आघाडीचा इमारत साहित्य ब्रँड असणाऱ्या अपर्णा एन्टरप्राईजेस लिमिटेडने ते व्हीटेरो टाईल्स या त्यांच्या विभागात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे आज जाहीर केले. गुंतवणुकीचे उद्दिष्ट आंध्रप्रदेश मधील पेड्डापूरम येथील व्हिटेरो टाईल्सची उत्पादनक्षमता वाढविणे हे आहे. या विस्ताराचे उद्दिष्ट हे जमीन आणि भिंतीच्या टाईल्सची वाढती मागणी पूर्ण करणे आणि विशेषकरून तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू तसेच ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील इतर राज्यांतील बाजारपेठांतील अधिकाधिक सरकारी आणि खाजगी प्रकल्पांचे काम मिळविणे हे आहे.

या गुंतवणुकीसह अपर्णा एन्टरप्राईजेसने व्हीटेरो विभागाच्या विकासाला आणखी बळकटी देण्याचे ध्येय ठेवले आहे. ब्रँडच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना अपर्णा एन्टरप्राईजेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन रेड्डी म्हणाले, “बीटूबी आणि बीटूसी (व्यवसाय ते व्यवसाय आणि व्यवसाय ते ग्राहक)अशा दोन्ही ठिकाणी ग्राहकांची मागणी वाढत असल्यामुळे भारतातील टाईल्स क्षेत्र पुढील ५ वर्षात ८% CAGR ने वाढत आहे. व्हिटेरो टाईल्सच्या विकास मार्गात हे मजबूतपणे प्रतिबिंबित होते. आम्हांला आधीपासूनच वाढती मागणी, या विभागात वाढत असलेल्या बाजारपेठीय संधी दिसत आहेत आणि आर्थिक वर्ष २१-२२ टाईल्स विभागात ५०% वाढीने बंद होईल अशी आम्हांला अपेक्षा आहे. विकासाचा हा दृष्टीकोन विचारांत घेऊन आम्ही यावर्षी या व्यवसायात १०० कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यात टाईल्स उत्पादन क्षमता विस्ताराचा सर्वाधिक वाटा आहे. या विस्तारासह आम्ही आमच्या उत्पादन योजनांना बळकटी देणे आणि भारतातील संघटीत टाईल्स बाजारपेठेतील बाजारपेठीय हिस्सा वाढविणे याकडे लक्ष देत आहोत.”

आंध्रप्रदेश मधील पेड्डापूरम येथील व्हिटेरो उत्पादन केंद्रात या ब्रँडने आणखी एक भरीव कामगिरी केली आहे. व्हिटेरो टाईल्ससाठीची उत्पादनक्षमता दर दिवसाला १५,००० चौरस फूट होती ती दुपटीने वाढवून दररोज ३०,००० चौरस फूट केली आहे.

उत्पादन क्षमतांच्या व्यतिरिक्त अपर्णा एन्टरप्राईजेस त्यांचे डीलर जाळे विस्तारण्यासाठी आणि बाजारपेठेतील स्थान मजबूत करण्यासाठी त्यांच्या स्त्रोतांना जोडून घेत आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनीने भारतातील त्यांचे जाळे २३%नी वाढविले आणि यावर्षी ते आणखी ३०% नी वाढविण्याची त्यांची योजना आहे.

Leave a Reply