Friday, June 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

धक्कादायक – अ. भा. मराठी साहित्य संमेलनात दोन प्रकाशक कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक : येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली होती. या दोन प्रकाशकांना बिटको रुग्णालयामध्ये किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

साहित्य संमेलनासाठी दररोज हजारो श्रोते तसेच व्हीआयपी व्यक्ति येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने तपासणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक ठेवले आहे. या पथकामार्फत शुक्रवार, शनिवार व आज रविवारी तपासणी केली जात आहे.दरम्यान,रविवारी सकाळी पुण्याहून आलेल्या दोन पुस्तक प्रकाशकांच्या कोरोना चाचण्या बाधित झाल्यामुळे वैद्यकीय विभागाची धावपळ उडाली. यातील एक पिंपरी चिंचवड तर दुसरा आळंदी येथील असून आता या प्रकाशकांच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे त्यांचा देखील कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.दरम्यान या दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींना तीव्र लक्षणे नसल्यामुळे त्यांना गाडीने घरगुती अलगीकरणासाठी पुण्याला पाठवले जाणार असून त्यांची माहिती पुणे महापालिकेला कळविले जाणार असल्याची माहिती डॉ. विजय देवकर यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading