Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाजी ब्रिगेडने साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेरांना फासले काळे

नाशिक : येथे  सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आलेले ज्येष्ठ पत्रकार  गिरीष कुबेर यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे समजते. 

गिरीश कुबेर आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. त्यानंतर ते बॅटरीच्या वाहनातून स्टॉल्स पाहण्यासाठी निघाले होते. याचवेळी अचानक आलेल्या दोन तरुणांनी संभाजी महाराजांचा जयघोष करत कुबेर यांना काळं फासलं. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पवारांचं स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading