Friday, June 26, 2026
Latest NewsSports

पुणे ओपन गोल्फ चॅम्पियनशिप  अभिजीत सिंग चड्डाला विजेतेपद

पुणे : अखेरच्या फेरीतील फोर अंडर 66 अशा अत्यंत प्रभावी कामगिरीच्या जोरावर नजीकच्या प्रतिस्पर्ध्यावर 6 फटक्याच्या अंतराने विजय मिळवताना चंदीगडच्या अभिजित सिंग चड्डा याने 40 लाख रुपये पारितोषिक रकमेच्या पुणे ओपन गोल्फ चॅम्पियनशिप मध्ये  विजेतेपदाचा मान पटकावला.पूना क्लब गोल्फ कोर्सवर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित सिंग   चड्डा ने सलग तिसऱ्या फेरीत एकाही बोगीची नोंद न करता चमकदार कामगिरी केली.

30 वर्षीय अभिजित सिंग याने नजीकचा प्रतिस्पर्धी कार्तिक शर्मावर तिसऱ्या फेरीअखेर(63-65-64-66) एका फटक्याची आघाडी घेतली होती. चौथ्या फेरीअखेर चार बर्डीजची नोंद करताना अभिजितने एकूण 21-अंडर 258 अशा एकूण गुणसंख्येसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देताना अभिजित सिंग चड्डा  ने संपूर्ण आठवडाभर प्रभावी कामगिरी केली. पहिल्या फेरीतील पहिल्या होलनंतर झालेल्या बोगीची चूक त्याने पुढच्या 71 होलमध्ये होऊ दिली नाही. याच कामगिरीच्या जोरावर सहा वर्षातील पाहिले विजेतेपद पटकवताना अभिजित सिंग चड्डाने 6,46,600/-  रुपयांची पारितोषिक रक्कम पटकावली. या विजयामुळे पीजीटीआय मानांकन यादीत अभिजीतने नऊ क्रमांकानी प्रगती करताना 15व्या स्थानावर झेप घेतली.

गुरुग्रामचा युवा खेळाडू कार्तिक शर्माने(66-60-67-71) अशा कामगिरीसह या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या फेरीअखेर केवळ एका फटक्याने पिछाडीवर असलेल्या कार्तिकला अखेरच्या फेरीतील 1-ओव्हर 71 अशा कामगिरीमुळे एकूण 15-अंडर264 अशा कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या अखेरच्या फेरीत त्याने एका बर्डीची नोंद केली असली, तरी दोन बोगी मुळे त्याने विजेतेपदाची संधी गमावली. तरीही डावखुऱ्या कार्तिक शर्मासाठी ही कामगिरी कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली.त्यामुळेच त्याला मानांकन यादीत सात क्रमांकानी प्रगती करून 18व्या स्थनावर झेप घेता आली. या मौसमात त्याने पाचव्यांदा पहिल्या10 क्रमांकात स्थान मिळवले आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कोलकत्ताच्या सुनीत चौरसियाने सलग दुसऱ्या फेरीत चांगली कामगिरी करताना एकूण 13-अंडर 266 अशा गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. चौरसियाच्या 65 गुणांची बरोबरी चंदीगडच्या युवराज सिंग संधू (7- अंडर272) , बेंगळुरूच्या सी मुनियप्पा(3-अंडर 276), आणि गुरुग्रामच्याअंकुर चड्ड्या(2-ओव्हर 281)या खेळाडूंनी ही केली.

चौथ्या व अंतिम फेरीअखेर पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवरील सर्वोत्तम कामगिरीचा निकष 70 गुण असा होता आणि ही फेरी वेळेवर सुरू झाली. परंतु पावसाचा अडथळा अखेरपर्यंत कायम राहिला.2010 आशियाई स्पर्धेतील रौप्य विजेत्या अभिजीत सिंगने पहिल्यापासून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. त्यातच नजीकच आव्हानवीर कार्तिकने सलग दुसऱ्या व तिसऱ्या होलला दोन चुका केल्यानंतर अभिजीतने त्याचा फायदा घेत आपली घौडदौड कायम राखली. पाचव्या व सहाव्या होलला 10फुटांवरून बर्डीची नोंद करताना त्याने तब्बल पाच फटक्यांची आघाडी मिळवली.

त्यानंतर, कार्तिकला ही आघाडी मोडता आली नाही. तसेच अभिजीतनेही सोळाव्या व सतराव्या होलला बर्डीची नोंद करताना तसेच तब्बल 66 फुटांवरून अचूक लक्ष वेध करताना आपली आघाडी वाढवत नेली आणि अखेर 6फटक्यांनी विजेतेपदाची निश्चिती केली.

बेंगळुरूच्या सईद साकीब अहमद(69)याने 9-अंडर270 अशी कामगिरी करताना चौथा क्रमांक पटकावला. पुण्याच्या खेळाडूंपैकी हौशी गोल्फपटू रोहन ढोले पाटीलने 75-67-68-70 अशा कामगिरी सह(एकूण 1-ओव्हर 280) संयुक्त 24वे स्थान मिळवले. तसेच, त्याने सर्वोत्तम हौशी खेळाडूचा करंडक ही पटकावला.

दिल्लीचा हौशी युवा खेळाडू कृष्णव चोप्रा हा भारताचा माजी क्रिकेटपटू निखिल चोप्राचा पुत्र असून त्यानेही 16व्या होलमध्ये होल-इन-वन अशी कामगिरी करताना एकूण 2-ओव्हर 281 अशा गुणांसह संयुक्त 26वेस्थान निश्चित केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading