बेरोजगारी व महागाई हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकार वर टीका
पुणे: केंद्र सरकारने 2 -3 वर्षा पासून महागाई व बेरोजगारी ही वाढवली आहे.विविध पक्षानी आंदोलन सुद्धा केले. तर अनेकांनी केंद्र सरकारवर टीका सुद्धा केली त्याच मुद्द्यावर केंद्र सरकारला बेरोजगारी व महागाई हे मुद्दे हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका पुण्यातील एका कार्यक्रमाला आले असता काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बेरोजगारी व महागाई या गोष्टींकडे केंद्र सरकारचे अजून लक्ष नाही. दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची शरद पवारांची भेट झाली, युपी मधील घटक पक्ष या निवडणुकीत जर एकत्र आले तर येणाऱ्या निवडणुकीत भाजप नक्कीच पराभूत होईल असा विश्वास त्यांनी परत व्यक्त केला. इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी पर्यंत त्यांनी अख्ख्या भारतात काँग्रेस पक्ष हा वाढवला. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
