गिरीश कुबेर यांना काळ फासणाऱ्या राजेश गुंड, सतीश काळे यांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांच्या सारख्या विकृताचे तोंड काळं केल्याबद्दल संभाजीब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष शिवश्री राजेश गुंड तसेच सतीश काळे यांचे संभाजीब्रिगेड तर्फे शिवाभिनंदन आहे मावळ लोकसभेचे अध्यक्ष राजेश गुंड यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे.
संभाजी ब्रिगेड अध्यक्ष शिवश्री मनोज आखरे,व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड ने अनेक वेळा इतिहासाचे चुकीचं लिखाण करणाऱ्या आणि महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवला आहे, शिवद्रोही गिरीश कुबेर याला काळ फासणाऱ्या आमचे सहकारी आणि संभाजी ब्रिगेड मावळ लोकसभेचे अध्यक्ष राजेश गुंड सतीश काळे यांचे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने शिवअभिनंदन अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली.
