Wednesday, June 24, 2026
Latest NewsSports

आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अर्णव पापरकर, अयान तेजाबवाला, तनिष्क जाधव यांची आगेकूच 

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित आर्यन पंप्स आशियाई ज्युनियर(कुमार) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अर्णव पापरकर, अयान तेजाबवाला, तनिष्क जाधव, जय दीक्षित या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अयान तेजाबवालाने राधेय शहाणेचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. अर्णव पापरकरने अंशुल सातवला 6-2, 6-0 असे नमविले. चुरशीच्या लढतीत सार्थ बनसोडे याने जय पवारचा टायब्रेकमध्ये 6-7(7), 6-3[10-4] असा संघर्षपूर्ण पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले: 

रक्षक विवेकनाथन(भारत)वि.वि.अर्जुन अभ्यंकर(भारत)6-1, 6-1;
जय दीक्षित(भारत)वि.वि.आर्यन देवकर(भारत)6-2, 6-0;

तनिष्क जाधव(भारत)वि.वि.यज्ञेश पांपरी(भारत) 6-0, 7-5;

रेथीन प्रणव सेंथिलकुमार(भारत)[2] वि.वि.अंकित बाथेजा(भारत)6-1, 6-2;

अयान तेजाबवाला(भारत)वि.वि.राधेय शहाणे(भारत)6-1, 6-0;

अर्णव पापरकर(भारत)वि.वि.अंशुल सातव(भारत)6-2, 6-0;

विनीथ मूत्याला(भारत)वि.वि.नील जोगळेकर(भारत)6-0, 6-1;

सार्थ बनसोडे(भारत)वि.वि.जय पवार(भारत)6-7(7), 6-3[10-4];

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading