Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

आज मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे: ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात – उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

Leave a Reply