गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत युवान ननांद, वैष्णवी आडकर या दोन भारतीय खेळाडूंचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
पुणे : डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात युवान नांदल याने, तर मुलींच्या गटात पुण्याच्या वैष्णवी आडकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित कोरियाच्या वोबीन शिन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताच्या ऋषी खोसलाचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या तानपात निरुद्रोण याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या भूषण होबमचा 6-3,6-3 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 15 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर आठव्या गेममध्ये भूषणने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत तानापतने भूषणची सर्व्हिस गेममध्ये ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये देखील तानापतने आपले वर्चस्व राखले व आठव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक करून हा सेट 6-3 असा जिंकत विजय मिळवला. सहाव्या मानांकित कझाकस्तानच्या मॅक्स बात्यूतेंको याने जपानच्या सो ओगिरीचे आव्हान 6-1, 6-1 असे मोडीत काढले. भारताच्या युवान नांदल याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायमच्या ठेवत सातव्या मानांकित आयुश भटचा 6-4, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या वैष्णवी आडकर हिने चौथ्या ,मानांकित श्रुती अहलावटचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना 1 तास 32 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने श्रुतीची पहिल्याच गेममध्ये, तर श्रुतीने वैष्णवीची दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर वैष्णवीने आपला खेळ उंचावत श्रुतीची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये वैष्णवीने आक्रमक खेळ करत करत श्रुतीविरुद्ध हा सेट 6-4 असा जिंकून विजय मिळवला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या चहाना बुधभट्टी व नंदिनी दीक्षित या जोडीने तैपेईच्या यु-युन ली व जपानच्या सारा साईतो या अव्वल मानांकित जोडीचा 6-0, 6-0असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी(मुख्य ड्रॉ): मुले:
वोबीन शिन(कोरिया)[1] वि.वि.ऋषी खोसला(भारत)6-1, 6-1;
युवान नांदल(भारत)वि.वि.आयुश भट(यूएसए)[7] 6-4, 6-2;
तानपात निरुद्रोण(थायलंड)[3] वि.वि.भूषण होबम(भारत)6-3,6-3;
मॅक्स बात्यूतेंको(कझाकस्तान)[6] वि.वि.सो ओगिरी(जपान)6-1, 6-1;
मुली:
आरझून सगेनडिकोव्हा(कझाकस्तान)[1] वि.वि.अरुणकुमार लक्ष्मी प्रभा(भारत)7-5, 6-2
वैष्णवी आडकर(भारत) वि.वि.श्रुती अहलावट(भारत)[4] 6-3, 6-4;
सारा साईतो(जपान)[3]वि.वि. सुहिता मारूरी(भारत)[6] 6-4, 6-0;
यु-युन ली(तैपेई)[2] वि.वि.झेनल रुस्तीमोव्हा(कझाकस्तान)[5] 6-3, 6-1;
मुले:
निशांत दबस(भारत)/चिराग दुहान(भारत)[2] वि.वि.अनर्घ गांगुली(भारत)/मसुदा शिंगो(भारत) 6-3, 6-3;
तानपात निरुद्रोण(थायलंड)/वोबीन शिन(कोरिया) [1] वि.वि.विनीथ मूत्याला(भारत)/जैष्णव शिंदे(भारत)6-3, 6-0;
मुनी अनंत मणी(भारत)/ऋषील खोसला(भारत)वि.वि.डॅनियल फेलकर(कझाकस्तान)/इस्लाम ओरीनबासर(कझाकस्तान)6-1, 6-1;
मॅक्स बात्यूतेंको(कझाकस्तान)/आरतूर खैरूडिनोव्ह(कझाकस्तान)वि.वि.आक र्ष गावकर(भारत)/प्रज्वल तिवारी(भारत)6-4, 6-3′
मुली:
चहाना बुधभट्टी(भारत)/नंदिनी दीक्षित(भारत)वि.वि.यु-युन ली(तैपेई)/सारा साईतो(जपान)[1] 6-0, 6-0;
