Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

सार्वजनिक बांधकाम विभाग – विद्युत उपकरणे सुसव्यवस्थित राखणारे कर्मचारीच शॉकमध्ये

पुणे :सार्वजनिक बांधकाम विद्युत शाखेचा यापूर्वीचा आकृतीबंध 3ऑक्टोबर 2011 च्या शासन निर्णयानुसार मंजूर झाला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत विद्युत शाखा आणि ऊर्जा विभागातंगत निरीक्षण शाखा या दोन्ही शाखा ऊर्जा विभागातंगत कार्यरत होते त्यानंतर 26 फेब्रुवारी 2015 च्या ऊर्जा विभागाच्या शासन निर्णयानुसार पदांचा सुधारित आकृतिबंध निश्चित केला.

या आकृतीबंधा नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने चलाखी करत केवळ कार्यालयीन पदे अस्तित्वात ठेवली. त्यातही अधीक्षक अभियंता , सहायक मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता उपअभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंता श्रेणीतील पदांच्या संख्येत वाढ करत आणि लिपिक तसेच शिपाई या वर्ग तीन आणि चार वर्गातील पदे कमी केली. त्यामुळे कार्यालयीन आस्थापने मध्ये पूर्वी मंजूर असलेल्या 835 पदांपैकी 119 पदे कमी केल्याचे दाखवून सुधारित आकृतिबंधतात केवळ 716 पदे ठेवल्याचे दाखवले आहे. तथापि अभियंता श्रेणीतील पदे वाढवल्याने वेतन आणि भत्यावरील खर्चात त्या पदा पुरती वाढ झाली आहे. या कारणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांवर सुधारित आकृतिबंध यामुळे अन्याय झाला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना अध्यक्ष मारुती शिंदे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला प्रताप धापटे, नंदकिशोर भरेकर, दिनेश कुचेकर उपस्थित होते. राज्य रेखाचित्र शाखा कर्मचाऱ्यांच्या मागण्या कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदे पूर्वीप्रमाणे नियमित करावी, तारतंत्री पदाची वेतन श्रेणी मधील तपास दुरुस्ती करून 2400 रुपये मिळावे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading