‘गदर 2’ चित्रपटातून तारा -सकिनाची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; शुटींगचे फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भारताच्या फाळणीवर आधारीत ‘गदर’ हा चित्रपट आजही सिनेरसिक आवडीने पाहतात. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आता सिक्वेल येत आहे. ‘गदर-2’ च्या शूटिंगला सुरूवात झाली असून या चित्रपटातून सानी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच अमीषा पटेलने या चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या चित्रपटात सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत तर अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत आसणार आहेत. गदर -2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केले आहे. ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
