राज्य सरकारमध्ये शिवस्मारक उभे करायचा दम नसेल तर संभाजी ब्रिगेड शिवस्मारक उभे करेल
– मनोज आखरे (महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)
मुंबई : रंगशारदा सभागृह बांद्रा -मुंबई येथे संभाजी ब्रिगेड चा वर्धापनदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला, यावेळी संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मनोज आखरे यांनी फसवी नोट बंदी, इंधन गॅस दरवाढ तसेच शेतकरी आंदोलन यावरून मोदी सरकार वर ताशेरे ओढले, तसेच शिवस्मारक,एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मराठा आरक्षण ,ओबीसी आरक्षण,सरकार मधील भ्रष्टाचारी मंत्री या मुद्यांवरून ठाकरे सरकारला सुनावले. तसेच राज्यसरकारला शिवस्मारक उभे करायचं नसेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं संभाजी ब्रिगेड शिवस्मारक उभे करेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला.तसेच येणाऱ्या काळात महापालिका, नगरपरिषद, जिल्हापरिष,पंचायतसमिती च्या निवडणुकांसाठी सज्ज राहा आणि तयारीला लागा अशी सुचना सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना केल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची राज्यसरकार खिल्ली उडवत आहे. असे महासचिव सौरभ खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगीतले, संभाजी ब्रिगेड च्या वर्धापनदिन सोहळ्यात मुख्य प्रवक्ते गंगाधर बनभरे,कोषाध्यक्ष संतोष गाजरे,प्रवक्ते शिवानंद भानुसे, संघटक तुषार उमराळे, यांच्या सह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले, वर्धापनदिना निमित्त महामेळाव्याला महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती, रंगशारदा सभागृह हजारो कार्यकर्त्यांच्या घोषणेने दणाणून गेले होते, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेड महामेळावा झाला.
