Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

क्रीडा अधिकारी मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

पुणे : पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक या प्रमाणे क्रीडा अधिकारी मंजुरीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रासने म्हणाले, यापूर्वी शिक्षण मंडळामार्फत क्रीडा अधिकार्यांच्या १८ पदांचा आकृतीबंध राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. परंतु सरकारने सात पदांना अनुमती दिली. महापालिकेची १५ क्षेत्रिय कार्यालय आहेत. प्रत्येक कार्यालयासाठी किमान एक क्रीडा अधिकारी असणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी आठ पदांना मान्यता द्यावी यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याच्या निर्णयाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Leave a Reply