fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 51 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून   पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 51 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 73रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 66हजार  021इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 96हजार688इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातीलतर0
पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9103जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 830रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 96रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3118 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading