Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

बसपाला विचारात घेतल्याशिवाय पुण्याचा विकास होऊ शकणार नाही -.ऍड. संदीप ताजने

पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२२ जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली लढेल व बसपाला विचारात घेतल्याशिवाय पुण्याचा महापौर होऊ शकणार नाही. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जाईल असे वक्तव्य. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड संदीप ताजने यांनी व्यक्त केले.

बहुजन समाज पार्टी पुणे शहरातील खडकवासला व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये ते बोलत होते . यावेळी महा.प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड ,प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, काळुराम चौधरी , पुणे जिल्हा प्रभारी मिलिंद भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी , महंमद शफी , वैभव चंदनशिवे ,मुकेश शेलार , अखिल मेश्राम ,अरुण गायकवाड, शिददराम गायकवाड ,विनोद गायकवाड ,सुशील कदम ,भारती वांजळे ,महिला अध्यक्ष दीपाली सोनोने ,कल्याणी बनसोडे ,प्रशांत वावरे ,लीना गेडाम,प्रशांत डोळस ,सुबोध कांबळे ,मेंकना कराळेकर आदी उपस्थित होते. संदीप कांबळे, सुरज खैरकर ,राहुल बोडरे ,दिनेश सकट ,नागेश चाबूकस्वार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading