Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

पुणे ग्रामीण भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्ग लोणावळा येथे संपन्न!

लोणावळा:भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेजमध्ये २६,२७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवसीय आयोजित निवासी प्रशिक्षण वर्ग भाजपा प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला._

या निवासी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रमुख मान्यवर जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, शरद बुट्टे पाटील, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, अ‍ॅड धर्मेंद्र खांडरे, अविनाश बवरे, अविनाश मोठे, सुदर्शन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन झाले. या प्रशिक्षण वर्गात विविध मान्यवरांचे विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन लाभले.

केशव उपाध्ये, माधव भंडारी,शरदराव बुट्टे पाटील
योगेश गोगावले ,सुनिलराव कर्जतकरवासुदेव नाना काळे,अ‍ॅड माधवीताई नाईक
  यांनी तीन दिवसीय सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. l या कार्यक्रमांचे संचालन जिल्हाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे तथा प्रशिक्षण प्रमुख अ‍ॅड धर्मेंद्र खांडरे, बवरे, सागर जोशी, प्रशांत कोतवाल, जोगिंदर डूमडे, ॲड संजय सावंत पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मावळ तालुक्याच्या वतीने संघटन सरचिटणीस सुनील चव्हाण, जेष्ठ नेते इंदरशेठ ओसवाल, अमोल केदारी, सागर शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षण वर्गात 120 च्या वर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. अ‍ॅड माधवी नाईक यांचे मार्गदर्शनाने समारोप झाला, अशी माहिती पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी ॲड. संजय सावंत पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading