Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यात तूर्तास तरी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही – आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणे : ‘ओमिक्रॉन’ हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून अनेक नागरीक भारतात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सध्या काळजीचे कोणतेही कारण नसून राज्यात तूर्तास तरी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज सांगितले.

राजेश टोपे म्हणाले,  मंत्रिमंडळाच्या बैठकीत परदेशातून येणाऱ्या विमानावर बंदी घालण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. ‘ओमिक्रॉन’ला घाबरण्याची गरज नाही. पण नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. पुढील काळात लॉकडाऊन करायचा असेल तर विरोधी पक्षांना विश्वासात घेवून निर्णय घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading