fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज एक आठवड्याचे निश्चित करण्यात आले असून पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबर 2021 रोजी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयक असणार आहेत.

विधानभवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री ॲड्. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्य व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशासाठीचे नियम –

  • मंत्री, राज्यमंत्री व अधिवेशनासाठी आलेल्या प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
  • आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे.
  • दर आठवड्याला  आरटीपीसीआर चाचणी होणार
  • मंत्री, राज्यमंत्री यांच्या सोबत केवळ एकाच अधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार
  • विधानमंडळ सदस्यांचे स्वीय, सहायक, वाहनचालकांसाठी विधान भवनाच्या बाहेरील प्रांगणात स्वतंत्र व्यवस्था
  • या काळात खासगी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading