Monday, May 4, 2026
ENTERTAINMENTLatest News

ज्येष्ठ कोरिओग्राफर के. शिवाशंकर यांचे निधन

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कोरिओग्राफर के. शिवाशंकर यांचे हैद्राबादमध्ये निधन झाले. रविवारी (दि. 28) रात्री एका खाजगी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुगन्या आणि दोन मुले विजय आणि अजय असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमधील कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कोविडसाठी उपचार सुरू होते. 

के. शिवाशंकर यांनी जवळपास 10 भाषांमध्ये काम केले आहे. मात्र बहुतांश काम त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत केले आहे. मास्टर शिवा शंकर या नावाने ते ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील कलाकारांनी शिवा शंकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पिटिआयच्या वृत्तानुसार, कोरोना झाल्यामुळे के. शिवाशंकर यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले होते. या आजारामुळे त्याच्या 90% फुफ्फुसांवर परिणाम झाला होता मागील काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्याचा मोठा मुलगाही व्हायरल इन्फेक्शनवर उपचार घेत आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले आहे की, ‘मास्टर गुरू शिवा शंकर यांच्या निधनाबद्दल कळाल्यावर खूप दु:ख झाले, त्यांचा वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण देवाच्या मनात काही तरी वेगळे होती. मास्टरजी तुमची नेहमी आठवण येईल.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading