Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

मारुती चितमपल्ली यांना पुणे प्रार्थना समाजाचा पुरस्कार जाहीर      

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस २०२१ मध्ये १५१ वर्षे पूर्ण होत आहे. या १५१ व्या वार्षिक उत्सवात संस्थेतर्फे दिले जाणारे डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांना आणि डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्कार पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन या संस्थेला देण्यात  येणार आहेत, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग उपस्थित होत्या.
पुरस्कार वितरण समारंभास  निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. जयंत उमराणीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण तर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वितरण होणार आहे.
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणा-या संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणा-या व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो.
गुरुवार दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘समाधी हरीची’ हा संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी दिनानिमित्त विशेष संगीतमय कार्यक्रम होणार आहे. रविवार, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बाल आनंद मेळावा होणार असून असून यामध्ये ईश्वर उपासना, भजन स्पर्धा, पारितोषिक वितरण आणि बालरंजन कार्यक्रम होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading