fbpx
Saturday, April 27, 2024
BusinessLatest News

पियाजिओच्‍या इलेक्ट्रिक विभागाच्‍या महिला कर्मचा-यांनी बारामती येथे सादर केली आपे इलेक्ट्रिक श्रेणी

पुणे: पियाजिओ वेईकल्‍स प्रा.लि. (पीव्‍हीपीएल) या इटालियन पियाजिओ ग्रुपच्‍या (दुचाकी विभागाची युरोपियन अग्रणी कंपनी) १०० टक्‍के उपकंपनीने आज त्‍यांच्‍या उत्‍पादनांची आपे इलेक्ट्रिक श्रेणी असेम्‍बल करणा-या महिला कर्मचारी विभागाला सादर करत भारतीय ऑटोमोबाइल उद्योगक्षेत्रामध्‍ये बेंचमार्क निर्माण केला.

महिला सक्षमीकरणाला चालना देण्‍यामध्‍ये उद्योग अग्रणी असलेल्‍या पियाजिओने बारामती व आसपासच्‍या भागामध्‍ये असलेल्‍या विविध तंत्रज्ञान संस्‍थांमधून या महिला कर्मचारीवर्गाला समाविष्‍ट केले आहे. असेम्‍ब्‍ली लाइनमध्‍ये सादर करण्‍यापूर्वी या महिलांना सुरक्षितता प्रक्रिया, साधनांचा वापर, इलेक्ट्रिक वाहने आणि बीएमस, मोटर, ई-बॉक्‍सशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात प्रशिक्षण देण्‍यात आले.

उद्योगक्षेत्रातील या पहिल्‍या उपक्रमाबाबत बोलताना पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डियागो ग्रॅफी म्‍हणाले, ”आमच्‍या ग्रुप तत्त्वाशी बांधील राहत आम्‍ही ईव्‍ही असेम्‍ब्‍ली लाइन निर्माण केली आहे, जिचे कार्यसंचालन पूर्णत: महिला कर्मचारीवर्गाकडून पाहिले जाते. मला सांगावेसे वाटते की, ही फक्‍त सुरूवात आहे आणि आम्‍हाला अजून लांबचा टप्‍पा गाठायचा आहे. आम्‍ही असेम्‍ब्‍ली लाइन, प्‍लाण्‍ट परिसर व कार्यालयांमध्‍ये अधिकाधिक महिलांची नियुक्‍ती करू. हे फक्‍त महिला सक्षमीकरणासाठी नसून ऑटो विभागातील कर्मचारीवर्गामध्‍ये समानता आणण्‍याप्रती देखील आहे, जे दीर्घकाळापासून दुर्लक्षित होते.”

एचआर पूजा बंसल म्‍हणाल्‍या, ”कामाच्‍या ठिकाणी वैविधता अत्‍यंत महत्त्वाची आहे, ज्‍यामुळे नवोन्‍मेष्‍कार व विकासाला चालना मिळते. पियाजिओ येथील धोरण महिला कर्मचा-यांना आर्थिक स्‍वालवंबता, अनेक संधी देण्‍याचा आहे, ज्‍यामध्‍ये करिअर विकास आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे त्‍यांना व्‍यवस्‍थापकीय व नेतृत्‍व पदांवर आणणा-या संधींचा समावेश आहे. आमचा महिला कर्मचा-यांना नियुक्‍त करून उत्‍पादन व शॉपफ्लोअरसाठी प्रशिक्षण देण्‍यासोबत व्‍यवसाय मूल्‍य साखळीमधील महिला कर्मचा-यांना नियुक्‍त व प्रशिक्षित करण्‍याचा देखील मनसुबा आहे.”

पियाजिओच्‍या बारामती येथील प्‍लाण्‍टमधील महिला कर्मचारी सर्व इलेक्ट्रिक मॉडेल्‍स – आपे ई-सिटी व आपे ई-एक्‍स्‍ट्रा असेम्‍बल करतात. या दोन्‍ही वेईकल्‍समध्‍ये फिक्‍स्‍ड व स्‍वॅपेबल बॅटरी सोल्‍यूशन्‍स आहेत. पियाजिओ सध्‍या आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील पहिल्‍या सहामाहीसाठी एल५एन इलेक्ट्रिक ३-व्हिलर कार्गो विभागामधील बाजारपेठ अग्रणी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading