भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या मताशी सहमत आहे -चंद्रकांत पाटील
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण अजूनही राज्य सरकारने केले नाही त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे काल पुण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी विलगीकरणावर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा करू असे काल सांगितले होते.त्यावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण केले नसल्यामुळे एसटी संपात कर्मचाऱ्यांच्या 60 च्या वर आत्महत्या झाल्या आहेत. त्यावर भारतीय जनता पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या मताशी सहमत आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
महा विकास आघाडी सरकारने दोन वर्ष जनतेची फसवणूक केली असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले,दोन वर्षात सरकारने कोणतीही विकासात्मक कामं केली नाहीत .केवळ वसूली काम सरकारनं केलं आहे.भ्रष्टाचार,गोंधळ,आणि अनागोंदी कारभार असं मागील दोन वर्षात सरकारच काम झालं आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी महा विकास आघाडी सरकारवर केला. पाटील यांनी अनिल देशमुख प्रकरणावर पण सुद्धा भाष्य केले अनिल देशमुख यांना पर्याय नव्हता म्हणून, अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले . असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
समाजाचा एकही घटक आज राज्य सरकारच्या कामावर समाधानी नाही कोरोना काळात सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरलय .कोरोना काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 9 कोटी रुपयांची मदत केली .असे पाटील म्हणाले.
नारायण राणे सारखे म्हणतात मार्च पर्यंत सरकार पडणार त्यावर पाटील म्हणाले, त्यांच्या वक्त्याव्यशी
मी पण सहमत आहे.
