Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

संविधान आणि संविधानिक संस्था धोक्यात – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

पुणे : महात्मा फुले यांनी ज्या वर्गाला ओळख देण्याचा प्रयत्न केला. त्याच वर्गाला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींनी केला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संविधानिक अधिकार देवून समृद्धीचा मार्ग दाखवला. आता मात्र संविधान आणि संविधानिक संस्था धोक्यात आहेत. संविधान संपवलं तर आपल अस्तित्व देखील संपून जाईल. त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित 131 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता दिन साजरा करण्यात आला. यावेळी  अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भूजबळ यांच्या हस्ते छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार2021’ देवून सन्मानित करण्यात आले, सत्काराला उत्तर देताना बघेल बोलत होते.  यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, कमल ढोले पाटील, दीप्ती चवधरी, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, जेष्ठ अभ्यासक हरी नारके, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, मंजिरी घाडगे, प्रीतेश गवळी, आमदार सिद्धार्थ कुशावाह, सुनील सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना बघेल म्हणाले, जिथे महात्मा फुले यांचा जन्म झाला अशा पुण्यभूमीला मी नमन करतो. महात्मा फुले येथे रहायचे अनेक पुस्तकांची निर्मिती येथे झाली तसेच समाज सुधारक कामालाही याच वास्तूत सुरूवात झाली. ही वास्तू त्यांच्या प्रत्येक कार्याची साक्षीदार आहे. त्याकाळात त्यांनी आपल्या विहीरीचे पाणी सर्वांसाठी खुले केले. अन् त्याच पाण्याने ते सर्व समाजाशी जोडले गेले. त्यांनी खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाज घडविला. आपल्याला बरोबरीचा अधिकार संविधानाने दिला पण आज तेच संविधान धोक्यात आहे. विधान संपवलं तर आपल अस्तित्व देखील संपून जाईल. त्यामुळे आपण सतर्क राहण्याची गरज आहे.

या प्रसंगी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी  समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेला इनमपिरीकल डेटा देत नाही आम्ही डेटा गोळा करायला तयार आहोत मात्र टो पर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये ही आमची भूमिका आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे लॉक एकीकडे जनजागृती करण्याचे नाटक करत रस्त्यावर उतरतात आणि दुसरीकडे आम्ही काढलेल्या आध्यादेशा विरोधात हायकोर्टात धाव घेतात हा दुटपीपणा चालणार नाही.

विरोधकांनी केलेल्या आरोपा मधून  न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी भाजपचे लोक अजूनही आम्हाला त्रास देत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कितीही भाकिते वर्तवण्यात येत असली तरी आमचे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ज्योतिबा आणि संवित्रीबाईं यांनी आम्हा महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. अन महिलांमधील कर्तुत्वाला नेर्तुत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी आम्हा महिलांना चौकटीच्या बाहेर जात अनिष्ठ रुडी परंपरा मागे सारत आम्हा महिलांना शिकणाचा अधिकार दिला अन् खऱ्या अर्थाने आम्हाला आत्मविश्वास दिला. राज कारणातही चडउतार असतात. पण जेव्हा कधी डगमगायला होत तेव्हा क्रांती ज्योती संवित्रीबाईंचा चेहरा डोळ्या समोर येतो अन् प्रेरणा मिळते. दीडशे वर्षांपूर्वी या माऊलीने इतका संघर्ष केला तर आपण काय ? पुरूषप्रधान संस्कृतीत ज्योतिबा – संवित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने महिलांना 50 टक्के आरक्षण दिल म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आपल्याला त्रास देणारे विदूषक समाजात अनेक असतात पण त्यांना तोंड देण्याची धमक आपल्यात असायला हवी.

हरी नरके म्हणाले, गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच महात्मा फुले यांच्या कर्तुत्वाची दाखल घेतली होती. आज आपला देश धर्मवाद आणि जातीयवादाच्या कचाट्यात आडकला आहे. गेल्या सात वर्षापासून भारतात जातीयवाद वाढत आहे. याचा मुकाबला करायचा असेल तर गांधी, आंबेडकर, महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. भारत सरकार ओबीसी डेव्हलोप मेंट वर नगण्य खर्च करते. यंदाच्या वर्षी तर ते ही पैसे दिले गेले नाहीत. एकीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षण केंद्र सरकारने रद्द  केले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे  ओबीसींच्या जनगननेसाठी पुढे आले आहेत. हेच तर समतेच कार्य आहे. यावेळी नारके यांनी महात्मा फुले आणि संवित्रीबाईं यांचे विचारांचा  छत्तीसगडच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी विनंती भूपेश बघेल यांना केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading