वेबसिरीज क्रॅकडाउन २.० चे शूट पुण्यात एमजी रोडवर
वेबसिरीज क्रॅकडाउनच्या पहिल्या भागास दर्शकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर क्रॅकडाउनचा दूसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वूट सिलेक्टसाठी निर्मित वेबसिरीज क्रॅकडाउन २.० चे शूट सध्या पुण्यात एमजी रोड येथे सुरू आहे. साकिब सलीम, इक्बाल खान, दर्श मोदी, निर्भय चौधरी, मयुख रे ,दिग्दर्शक अपूर्व लाखिया आणि प्रोड्यूसर समीर शेख याचसोबत पुणे लाइन प्रोड्यूसर – इम्रान शेख (सन डे फिल्म्स) हे यावेळी आज उपस्थित होते.
