Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भिडेवाड्यात साकारणार सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा

पुणे : महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या.

भिडे वाड्यामधे स्मारक उभारण्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस भिडेवाड्यातील गाळेधारक दुकानदार तसेच राहिवास्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी या सूचना केल्या.  यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना भूजबळ म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी या इमारतीत असलेले गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा असे सांगितले. यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले ,भिडे वाड्याच्या खालच्या मजल्यावर दुकाने आहेत. सध्या ही जागा एका बँकेच्या ताब्यात आहे. बॅक आणि मुळ मालक यांच्यामधे याबाबत न्यायालयात वाद सुरु आहे. बँकेचे अधिकारी आणि मुळ मालक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. त्यानंतर न्यायालयातील वाद संपेल अशी अपेक्षा आहे. भिडे वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. ही शाळा महापालिकेकडून चालवली जाईल. जवळपास आठ हजार स्क्वेअर फूट जागा शाळेसाठी उपलब्ध होईल. याच जागेवर मुलींची शाळा सुरु करणे हीच सावित्रीबाईना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading