ABVP – बारामती शहर कार्यकारिणी घोषित
बारामती: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली, या वेळी कार्यक्रमाची सुरवात संविधान वाचून करून करण्यात आली,संविधान वाचन निकिता दुबळे यांनी केले,
२६/११ मुंबई येथे ताज हॉटेल मध्ये अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज अभाविप बारामती शाखेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली,या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल ठोंबरे(महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री) होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली हजारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अभाविप मांडणी प्रा. हरिदास राऊत व विक्रम शिंदे यांनी सांगितले, या कार्यक्रमास निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. सुनील पाटील यांनी २०२१-२०२२ वर्षाची नूतन शहर कार्यकारिणी घोषित केली, व तसेच कार्यक्रमाचा समारोप प्रिया लोखंडे यांनी वंदे मातरम घेवून करण्यात आला,
