Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

संविधान दिनानिमीत्त रिक्षा चालकांनी केला संविधानाचा जागर

पुणे: संविधान दिनाचे औचीत्य साधून मोरे विद्यालय रिक्षा संघटना संलग्न रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवडने एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जागर संविधानाचा आयोजन केले होते.

यावेळी अण्णा कोंढेकर म्हटले कि संविधानाची ताकद आपण अजून ओळखू शकलो नाही ती जर ओळखली तर खरा आपल्या स्वप्नातील भारत घडवू शकू. आभाळाची आम्ही लेकरे या गाण्याने कार्यक्रमाची सुरवात झाली. स्टॅण्डवरील २५ हुन जास्त रिक्षाचालकांनी संविधानाची प्रास्ताविका वाचून आम्ही सर्व असंघटित क्षेत्रातील कष्टकरी, कामगार, रिक्षाचालक सामाजिक सुरक्षेचे अधिकारी आहोत पण आमची कुठे नोंद घेतली जात नाही असे मत मांडले.

या प्रसंगी सामाजिक सुरक्षा व रिक्षा चालकाचा काय संबंध? भारतीय संविधानाचा व रिक्षा चालकाचा काय संबंध? कल्याणकारी मंडळ व संविधान यांचा काय संबंध? आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तर अतिशय सोप्या भाषेत लोकायतचे कार्यकर्ते जितेंद्र पाफाळे यांनी दिली.

संविधानातील विविध कलम जसे कि कलम – ३९ – (क) स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क सारखाच असावा. (घ) दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे, कलम ३९ (ख) – सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रितीने समाजाच्या भौतिक साधनसंपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी, कलम ३९ (ग) – आर्थिक यंत्रणा राबविण्याच्या परिणामी संपत्ती व उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक अशा रितीने एकाच ठिकाणी होऊ नये, कलम ४३ -राज्य सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग कारण्याची कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल हे भरत उत्तेकर,श्रीराम जगदाळे, किशोर अडवे, सतीश कमलापुरे, दशरथ चाकणकर या रिक्षा चालकांनी वाचत त्याचा आपला रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे हे समजून घेतले.

वरील कलमांचे स्टिकर रिक्षातही चिटकवले जेणेकरून बसणाऱ्या प्रवांशानी ही ते वाचावे. या संविधान जागर कार्यक्रमास पंचायतीचे बाळासाहेब पोकळे, महादेव केमसे, मधुकर भुजबळ, अजित पेंटर, निखिल रांजणकर , विशाल बागुल, माजी नगरसेवक हनुमंत राऊत उपस्थित होते. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading