Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत आयोजित वाचन शिबीर

पुणे:आजच्या व्हाट्सअप्पच्या जगात पुस्तकांना आपण जणू दूर लोटलं आहे. ज्यामुळे उथळ ज्ञानाचा खळखळाट होऊन माणसाची विवेकबुद्धी बोथट झालेली दिसत आहे. वाचनाची आवड पुन्हा रुजावी आणि आपल्या इतिहासाची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने हे वाचन शिबीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचार पेरणारे, “शेतकऱ्याचा आसूड”कार सत्यशोधक ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले ग्रंथ तसेच त्यांवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन करून चर्चा घेण्यात येणार आहे. हे लोकायत आयोजित वाचन शिबीर , 28 नोव्हेंबरला सकाळी दहा ते चार कॅनरा बँकेसमोर, लॉ कॉलेज रोड, नळस्टॉप, येथे होणार आहे अशी माहिती विशाल बागूल यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading