आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 95 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 95 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 62हजार  01इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 96 हजार 279 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातीलच 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9099जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 823 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 101रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4842 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: