भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान – जोहरभाई चुनावाला
पुणे : ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की, तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील दिग्गजांचा सन्मान पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यामध्ये गायक अमर काळे यांना पुणे प्राईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर उत्कृष्ट आयोजक म्हणून जोहरभाई चुनावाला, संगीतरत्न मनीषा निश्चल, संगीतरत्न हेमंतकुमार पांडे, पदार्पण गायिका राजश्री पवार आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आहे.
चुनावाला यावेळी बोलताना म्हणाले की जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे.भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान आहे.
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन संदीप पाटील सिम्फनी इव्हेंट यांनी केले होते तर प्रमुख पाहुणे किशोर सरपोतदार, मोहन कुमार भांडरी मॉम ऑफ इंडिया हे होते.
