शरदचंद्रजी पवार सहाय्यता केंद्राचा राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे:दत्तवाडी येथे कसबा मतदारसंघाचे उपाध्यक्ष नितीन जाधव यांनी सुरू केलेल्या “लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब सहाय्यता केंद्राचा” शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री दत्ता भरणे शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला. दत्तवाडी परिसरातील नागरिकांची गरज ओळखून सुरू केलेल्या हे केंद्र नागरिकांच्या प्रशासकीय कामांत उपयोगी पडेल असा विश्वास कार्यक्रमास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.सदर प्रसंगी सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते,नागरिक,विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: