शिवसेना आमच्यापासून दूर गेल्याने आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही – चंद्रकांत पाटील

पुणे:भाजप -शिवसेनमध्ये दररोज सावरकरांबद्दल काही तरी नवीन वाद होत आहे .त्यावर सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका झाली तेव्हा आम्ही सभागृह बंद पाडले.सेना-भाजप एकत्र असताना हिंदुत्वावर आघात झाल्यावर बाळासाहेब कडाडून हल्ला करायचे, त्यातून अनेकांची हिंमत व्हायची नाही. पण म्हणून काही बिघडलं नाही. आम्ही आमचं मिशन रक्तातच ठेवलंय. त्यावर शिवसेना आमच्यापासून दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांना म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले सावरकरांवर जहरी टीका झाल्यावर सेना आता रिऍक्ट झालेली दिसत नाही. जयंती-पुण्यतिथीला ट्विटही नाही. असे पाटील म्हणाले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कोणा कोणाची आघाडी व कोणा कोणाची युती होणार याची चर्चा चालू आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले ,काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा लालूंचांगल आहे. त्यांच्याबरोबर सरकार करायचं म्हणजे तसं चालावा लागणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

विनोद तावडे ना विधानपरिषदे वर पुन्हा घेतले आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मला वैक्तीश आनंद
संयम आणि निष्ठा ठेवली की पुन्हा संधी मिळतेच . पंकजा मुंडे ना पक्ष दूर ठेवते आहे अशी चर्चा राज्यात आहे त्यावर माध्यमे चुकीची अर्थ लावतात तसं काही नाही.त्यांना संघटनेची जबाबदारी आहे. असे बोलून चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल जी चर्चा चालू आहे त्याला पूर्णविराम दिला. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल पंकजाताई आणि विनोद तावडेंना संधी मिळेल. वर्षभरात खूप स्कोप आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: