Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय कोथरूड नाट्य परिषदेचा यशवंत वेणू पुरस्कार अशोक हांडे आणि रंजना हांडे यांना जाहीर

पुणे ः-अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येणारा 2021 वर्षीचा यशवंत वेणू पुरस्कार यंदा निर्माता,लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, कलादिग्दर्शक, गायक, अभिनेता आणि सूत्रसंचालक अशा विविध भुमिकेत सहज वावर असलेले अशोक हांडे आणि रंजना अशोक हांडे यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.15 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे पुणे मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार आणि उद्योजक अमित गोखले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, प्रविण बर्वे आणि सत्यजीत धांडेकर यांनी कळवीले आहे.या आधी या पुरस्काराने शी.द.फडणीस दांमपत्य, ज्येष्ठ कलाकार जयंत सावरकर आणि अभिनेते मोहन जोशी यांना देण्यात आला आहे.

यावेळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या वर्धापनदिना निमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे प्रतिभावंत मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधत त्यांच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम होणार आहे. गफार मोमीन आणि मनिषा निश्चल शांता शेळके यांच्या गीतांना स्वरसाज चढवणार असून विनया देसाई या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.प्रसन्न बाम, अमृता केदार, निलेश देशपांडे, अमित कुंटे, अभय इंगळे हे साथसंगत करणार असून सत्यजीत धांडेकर यांची ही मुळ कार्यक्रम संकल्पना आहे.

सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य असून पुणेकर रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading