Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

नृत्य सादरीकरणातुन प्रकटल्या ‘चौसष्ठ योगिनीं ‘ !

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित​ ​कलासक्त (पुणे) यांच्या ‘ध्यायेती योगिनी’ या नृत्य सादरीकरणाने ​शनिवारी उपस्थितांची मने जिंकली.शनिवारी,२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून करून सांस्कृतिक प्रसार उपक्रमाची माहिती दिली. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०६ वा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमांत अलौकिक उर्जा शक्ती असलेल्या ६४ योगीनींचा नृत्याद्वारे घेतलेला शोध सादर करण्यात आला.ओडीसा मध्ये हिरापूर येथे आणि मध्य प्रदेशात चौसष्ठ योगिनींचे मंदीर आहे.निसर्गातून ऊर्जा घेणाऱ्या या योगिनी गूढ आणि स्वयंभू आहेत.सर्व बंधनातून मुक्तीचा संदेश या योगिनी देतात. भरत नाट्यम् आणि ओडिसी या दोन्ही नृत्यप्रकारात त्यांचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाची संहिता रसिका गुमास्ते यांची होती संगीत मॅजिक नोट स्टुडियो यांचे होते.प्रमद्वरा कित्तूर,रसिका गुमास्ते यांनी निवेदन केले.संदीप चौगुले आणि राधिका देशपांडे यांनी संयोजनात विशेष योगदान दिले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता. कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून प्रवेश दिला गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading