बोपोडीत शासन आपल्या दारी उपक्रमास उदंड प्रतिसाद

पुणे : कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पीएमपीएलचे संचालक प्रकाशभाऊ ढोरे व भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने बोपोडी येथील राजेंद्रप्रसाद विद्यालयात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात बोपोडी मध्ये करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बोपोडी येथे शासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थतीत राहणार आहेत. हे शिबिर शनिवार (दि. २०) व रविवार (दि.२१) दोन दिवस चालणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड,श्रावण बाळ योजना, विधवा, अपंग वेतन योजना, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवीन वीज मीटर बसवणे, महा ई सेवा अंतर्गत येणाऱ्या सेवा, शहरी गरीब योजना, नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती करणे, तलाठी रहिवासी दाखला, डोमीसाईल सर्टिफीकेट, उत्पन्न दाखला, प्रतिज्ञापत्र आदी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. औंध बोपोडी भागातील नागरिकांचा याला उत्तम प्रतिसाद लाभत असून सकाळपासून येथे लोकांनी रांगा लावत गर्दी केली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: