Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

कामानंतर आता रस्त्याची दुरुस्ती पथविभागाकडे निकृष्ट दर्जाचे काम टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे:समान पाणीपुरवठा योजनेतीईनचे काम केल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती करण्याचे कम आता पथ विभागाकडे देण्यात येणार आहे. या कामाचा खर्च काम करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे. काम झाल्यानंतर संबंधीत ठेकेदाराकडून योग्य प्रकारे रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शहरात सध्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत शहरात 1700 किलोमिटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरी करण्यात आले असून आत्तापर्यंत 1150 किलोमिटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

जलवाहिन्या टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्तीचे काम ठेकदाराकडून केले जाते. मात्र, ठेकेदाराकडुन योग्य पध्दतीने रस्ते पुर्ववत केले जात नसल्याने प्रशासनाला धारेवर धरले जात आहे. महापालिका आयुक्त यांनी सुध्दा काम योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. महापालिका प्रशानाने दीड महिन्यात हे रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता महापालिकेचा पथविभागाच रस्ते दुरुस्तीची जबाबदारी देण्यात येणार आहे. या कामाचा खर्च काम करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे.

Leave a Reply