शहरातील बालकांना सुरक्षा त्यांचे हक्क आणि उत्तम आरोग्य मिळावं – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता


पुणे:लहानपणी आपल्या सर्वांनाच पोलीस काकांची भीती घातली जाते,हट्ट असो व मोठ्यांना न पटणाऱ्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला पोलिसांची भीती घातली जाते.पण हीच भीती दूर करून पुणे शहरातील बालकांना सुरक्षा, त्यांचे हक्क आणि उत्तम आरोग्य मिळावं यासाठी सिंहगड पोलीस स्टेशमध्ये बालस्नेही पोलीस कक्ष उभारण्यात आलाय.
आज बालस्नेही कक्षाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अमिताभ गुप्ता बोलत होते.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या बालस्नेही पोलीस कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र शिसवे, झोन 3च्या पुणे पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या कॅरोलिन एडॉर दे बॉल्टर, शीतल अस्तित्व NGO च्या श्रीमती गायत्री कोटबागी उपस्थित होत्या.यावेळी चिमुकल्या दोस्तांची मुख्य उपस्थिती पाहायला मिळाली.या मुलांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहायक आयुक्त रवींद्र शिसवे यांना गुलाबपुष्प भेट दिलं.

Leave a Reply

%d bloggers like this: